आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Disel Price Cut, But Half Benefit To Citizens

पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई; पण जनतेला निम्माच फायदा, नवे दर रात्रीपासून लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - पेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रु. प्रतिलिटरने स्वस्त झाले आहे. नवे दर शुक्रवारी रात्रीपासून लागू झाले आहेत. पण सरकारने लोकांना अर्धाच फायदा दिला. पेट्रोल-डिझेलवर दोन-दोन रुपये अबकारी शुल्क वाढवले. हवाला मात्र पुन्हा विकासाच्या गरजेचा देण्यात आला. यापूर्वी १६ डिसेंबरला पेट्रोल-डिझेल २.२ रुपयांनी स्वस्त झाले होते. पेट्रोल ऑगस्टपासून ९ वेळा तर डिझेल ऑक्टोबरपासून ५ वेळा स्वस्त झाले. सरकारने नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४ वेळा अबकारी शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत सरकारी उत्पन्नात जवळपास २०,००० कोटींची वाढ होईल. सरकारने अबकारी शुल्क वाढवले नसते तर पेट्रोल ७.७५ रुपये आणि डिझेल ६.५० रुपयांनी स्वस्त झाले असते.

7 महिन्यांत जनतेचा 17%, सरकारचा 84%, कंपन्यांचा 101% फायदा

पेट्रोल
असे जाणून घ्या गणित
जनता : १६ जून २०१४ ला पेट्रोल दर ७१.४६ रु. प्रतिलिटर होते. आता ५८.९१ रु. १२.५५ रुपये स्वस्त. फायदा 17.5%चा.
सरकार : १६ जून २०१४ रोजी अबकारी शुल्क ९.४८ रुपये होते. आता १७.४६ रु. म्हणजे 84% फायदा.
तेल कंपनी : १६ जून २०१४ ला मार्जिन ३.१९ रु. होते. आता ६.४२ रुपये. म्हणजे 101% फायदा.

डिझेल
१९ ऑक्टोबर २०१४ला नियंत्रणमुक्त. तेव्हा ५५.६० रु./ली. आता ४८.२६ रु. म्हणजे ७.३४ रुपये स्वस्त. 13.2% फायदा.
दरम्यान, क्रूडची भारतीय बास्केट 58% स्वस्त
*16 जूनला क्रूड 118 डॉलर प्रतिबॅरल होते.
दोन महिन्यांत चौथी शुल्कवाढ
12 नाेव्हेंबर : पेट्रोल व डिझेलवर 1.50 रुपये प्रतिलिटर.
2 डिसेंबर: पेट्रोल 2.25 रुपये, डिझेलवर
1 रुपया प्रतिलिटर.
1 जानेवारी : पेट्रोल व डिझेलवर 2 रुपये प्रतिलिटर.
16 जानेवारी : पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये प्रतिलिटरची अबकारी शुल्कवाढ
पुढे वाचा