आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल एक रुपयाने स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरात एक रुपयाने कपात केली. नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यामुळे औरंगाबाद शहरात प्रतिलिटर ७६ रुपये ६० पैसे दराने मिळणारे पेट्रोल आता ७४ रुपये ५८ पैसे दराने मिळेल. डिझेलही अडीच रुपयांनी स्वस्त होईल, आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच १९ ऑक्टोबरनंतर घोषणा होईल.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १९ ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर डिझेल स्वस्त होईल,अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. सरकारने डिझेलच्या दरात कपात केली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांना गेल्या महिनाभरापासून किरकोळ विक्रीवर नफा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी कच्च्या तेलाच्या दरात १.७० टक्क्यांनी घट होऊन तो ८४.२८ डॉलर प्रतिबॅरल झाला आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर २०१० रोजी डिझेल २.३५ रुपये प्रतिलिटरने स्वस्त झाले होते. दिल्लीत सध्या डिझेलचे दर ५८.९७ रुपये प्रतिलिटर आहेत.