आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Price Come Down By 1.30 Rupee, Diseal Hiked By 5 Rupee

पेट्रोल दीड रुपयाने स्वस्त, तर डिझेल 5 रुपयांनी महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाल्याने येत्या आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर दीड रुपयाने स्वस्त होऊ शकते. दुसरीकडे, डिझेल 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.


पेट्रोलियम सचिव विवेक रे यांनी गुरुवारी सांगितले, डिझेल व गॅसमध्ये दरवाढीची गरज आहे. कंपन्यांच्या बोजाचा काही वाटा ग्राहकांना उचलावा लागेल. दोन महिन्यांत सबसिडीचा बोजा 20 हजार कोटींनी वाढला आहे. ती 1.80 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून डिझेलमध्ये प्रतिलिटर 5 रुपये, केरोसिनमध्ये 2 रुपये व गॅस सिलिंडर 50 रुपये दरवाढ करावी असे म्हटले आहे. तसेच डिझेलमध्ये दर आठवड्याला दरवाढ व्हावी, गॅसचे दर चार टप्प्यांत 200 रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना आहे.


एलपीजी गॅसमध्येही होणार
50 रुपयांची दरवाढ

सबसिडी 1.80 लाख कोटींवर
सबसिडीवरील डिझेल, केरोसिन व एलपीजी गॅसच्या विक्रीमुळे होणारा महसुली तोटा चालू वित्तवर्षात 1,80,000 कोटींवर जाईल. 2012-13मध्ये हा आकडा 1,61,000 कोटी रुपये होता.