आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Price Cut Likely 70 Paise Appreciates Against Dollar

ऐन निवडणुकीत जनतेला दिलासा; पेट्रोल 70 पैशांनी झाले स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सावरणारा भारतीय रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलच्या कमी झालेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या दरात 70 पैसे प्रतिलिटर कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज (मंगळवार) सायंकाळी पेट्रोलच्या दरात कपात केल्याची घोषणा केली. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. दरवाढीत व्हॅट आणि अन्य कर राज्यानुसार वेगवेगळे राहातील.

एप्रिलच्या सुरुवातीलाही तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 75 पैसे प्रतिलिटरप्रमाणे कपात केली होती. फेब्रुवारीत तेल कंपन्यांनी पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्‍याचा निर्णय घेतला होता. पेट्रोलच्या 60 तर डिझेलच्या दरात 50 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आयात स्वस्त झाली आहे. परिणाम म्हणून पेट्रोल प्रतिलिटर एक रुपयाने स्वस्त होण्याची शक्‍यता गेल्या आठवड्यात वर्तविण्यात आली होती.