आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PF Account Transfering Become Easy, EPFO Website Activate

पीएफ खाते हस्तांतरित करणे झाले सुलभ, ईपीएफओचे संकेतस्थळ कार्यान्वित होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नोकरी बदलल्यानंतर आपले पीएफचे खाते दुसर्‍या नवीन खात्यात कोणत्याही प्रक्रियात्मक अडथळ्यांशिवाय ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित होणे आता शक्य झाले आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने दोन ऑक्टबरला ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर संकेतस्थळ सुरू केले होते. आता 31 ऑक्टोबरपासून हे संकेतस्थळ पूर्णत: कार्यान्वित होणार आहे.

पीएफ खाते हस्तांतर प्रकरण हाताळणीबाबत मोठय़ा प्रमाणावर वाईट प्रसिद्धी झाली होती; परंतु ऑनलाइन ट्रान्सफर क्लेम संकेतस्थळ पूर्णत: कार्यान्वित झाल्यानंतर हे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालन यांनी व्यक्त केली आहे.

एक कंपनी सोडून नवीन कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधीचे खाते हस्तांतरित करण्यासाठी 31 ऑक्टोबरनंतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही, असेही जालन यांनी स्पष्ट केले. भविष्य निर्वाह निधीचे खाते ऑनलाइन हस्तांतरित करण्याच्या या सुविधेमुळे कामाचा भार मोठय़ा प्रमाणावर कमी होणार आहे. कारण अशा प्रकारच्या दाव्यांसाठी दरवर्षी जवळपास 13 लाखांपेक्षा जास्त अर्ज भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे येत असतात. भविष्य निर्वाह खात्याचे सहज हस्तांतर करता यावे यासाठी इपीएफओ अशा प्रकारचे दावे निकालात काढण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारत आहे. ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून तीन दिवसांच्या आत पीएफ खाते हस्तांतरित करता येणार आहे.

पूर्व तयारी म्हणून इपीएफओने 25 जुलैपासून कंपन्यांची डिजिटल स्वाक्षरी नोंदवेण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत 30 हजारांपेक्षा जास्त कंपन्या किंवा आस्थापनांनी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे डिजिटल स्वाक्षरीची नोंदणी केली आहे.


दाव्यांचा जलद निपटारा
बड्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या बदलण्याचे प्रमाण जास्त असते. विशेषकरून माहिती-तंत्रज्ञानसारख्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कर्मचारी, असे हे प्रमाण आहे. भविष्य निर्वाह निधीने 2011 -12 मध्ये जवळपास 6.9 लाख आस्थापनांमधील पीएफ खात्यांचे व्यवस्थापन केले होते. मागील आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधी संघटनेने 107.62 लाख दाव्यांचा निपटारा केला. त्यापैकी जवळपास 80 टक्के दाव्यांची पूर्तता प्रक्रिया 30 दिवसांच्या आत झाली. यंदाच्या आर्थिक वर्षात 1.2 कोटी दावे येण्याची अपेक्षा असून त्यामध्ये माहिती-तंत्रज्ञानसारख्या टेक्नोसॅव्ही कंपन्यांकडून 13 लाख पीएफ हस्तांतर दाव्यांचा अंदाज ईपीएफओने व्यक्त केला.