आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PF Contribution For Salary Of 15 Thousand Rupees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 हजार रुपये मासिक वेतनावर कापला जाईल पीएफ; कर्मचार्‍यांची बचत वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/ नवी दिल्‍ली- कर्मचार्‍यांच्या निश्चित मासिक वेतनावर भविष्‍य निर्वाह निधी (पीएफ) कपातीची मर्यादा वाढवण्‍याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कपातीची मर्यादा आता 15 हजार रुपये करण्यात येणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत. कामगार मंत्रालयाने याबाबचा मसुदा अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे.

कर्मचार्‍यांच्या निश्चित मासिक वेतनावर पीएफ कपातीची मर्यादा सध्या 6500 रुपये इतकी आहे. आता ही मर्यादा 15 हजार रुपये केली जाणार असल्याने त्याचा फायदा लाखों कर्मचार्‍यांना होणार आहे. कर्मचार्‍यांची बचत वाढणार असल्याचेही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) क्षेत्रीय आयुक्त प्रथम (मप्र) अजय मेहरा यांनी सांगितले.

दरम्यान, मेहरा यांनी एक ऑगस्ट रोजी पदभार स्विकाराला आहे. पीएफ संघटनेच्या निवृत्ती वेतन योजना सध्या तोट्यात आहे. तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पीएम कपातीच्या मर्यादेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'कसा कापला जातो पीएफ'