नवी दिल्ली- देशातील साडेपाच कोटी कर्मचार्यांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी सरकारने खूषखबर दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफ) शुक्रवारी
आपल्या सभासदांच्या ईपीएफच्या व्याजदरात पाव टक्क्याने (0.25) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या ईपीएफवर 8.50 टक्के व्याज दिले जाते. त्यात पाव टक्का वाढ करण्यात आली असून व्याजदर 8.75 झाला आहे. सरकारच्या निर्णयाचा देशातील पाच कोटींपेक्षा जास्त पीएफ खातेधारकांना लाभ मिळणार आहे.