आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या कंपन्यांही येणार पीएफच्या कक्षेत; भविष्य निर्वाह निधी कायद्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भविष्य निर्वाह निधी जमा करण्यासाठी वेतनाची कमाल मर्यादा वाढवल्यानंतर आता जास्तीत जास्त कंपन्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. सध्या 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणार्‍या कंपन्या पीएफच्या कक्षेत आहेत. हा संख्या घटवून 10 कर्मचारी असणार्‍या कंपन्यांसाठी पीएफ लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. कामगार राज्यमंत्री विष्णू देव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
ते म्हणाले, यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह कायदा 1952 मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव केव्हा लागू होईल याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. नव्या प्रस्तावाने किती कर्मचार्‍यांना फायदा होईल याची माहिती अद्याप घेण्यात आलेली नाही.
कामगारांचा फायदा :
देशातील आघाडीची उद्योग संघटना फिक्कीने यासंदर्भात सांगितले की, यामुळे कंत्राटी तसेच कमी कालावधीसाठी काम करणार्‍या तीन कोटींहून जास्त कामगारांना फायदा होईल. सध्या हे कामगार पीएफ कपातीला विरोध करतात. वारंवार नोकरी बदलल्याने पीएफचा आपल्याला फायदा होणार नाही, अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे नवा प्रस्ताव त्यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहे.