आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pharma Fund Give Very Good Returns, Divya Marathi

फार्मा फंड देणार भरभरून, बाजारातील तेजीचा लाभ मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेअर बाजार आपल्या उच्चांकी स्तराच्या आसपास आहेत. अशा स्थितीत नेमके काय करावे या संभ्रमात गुंतवणूकदार आहेत. काही तज्ज्ञ नफा पदरात पाडून घेण्याचा सल्ला देत आहेत, तर काही जण आहे तसे राहण्याचा सल्ला देत आहेत. कारण बाजार ऐतिहासिक उच्चांकावर असून त्यात घसरणीचाही तितकाच धोका आहे. याला पर्याय म्हणून काही तज्ज्ञ डिफेन्सिव्ह (सुरक्षित) म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. वित्तीय नियोजनकार अनिल कौल यांच्या मते ही गुंतवणूक किमान तीन वर्षांसाठी असावी.

सातत्यपूर्ण चांगली कामगिरी
फार्मा क्षेत्राने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी नोंदवली आहे. कौल यांच्या मते, आगामी काळातही हे क्षेत्र चांगली कामगिरी करण्यात यशस्वी राहील. गुंतवणूकदारांसाठी एसबीआय फार्मा फंड आणि रिलायन्स फार्मा फंड हे गुंतवणूकदारांसाठी चांगले फंड आहेत. आपल्या सोयीनुसार व आवश्यकतेनुसार गुंतवणूकदार यात एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकतात. मात्र, ही गुंतवणूक दीर्घकालीन असावी.

फार्मा फंडावर डाव लावणे योग्य
अनिल कौल यांच्या मते, रुपयाचे अवमूल्यन, निर्यातीतील वाढ आणि नव्या औषधांचे सादरीकरण यामुळे हे क्षेत्र चांगल्या कामगिरीच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील कंपन्यांबाबत चांगल्या बातम्या आल्या आहेत. अमेरिकेत या कंपन्यांच्या उत्पन्नात भरीव वाढीची परिस्थिती आहे. ही स्थिती येत्या काही तिमाहीत राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, अर्थव्यवस्थेतील सातत्याने होणा-या सुधारणामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वाढतो आहे. त्यामुळे इक्विटी योजनात गुंतणूक करणा-या फंडाकडून सातत्याने चांगला परतावा मिळतो आहे.