आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता फेसबुकवर मिळाली नवी सुविधा, फोटो अल्‍बमही करा शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकने नुकतेच काही अपडेट्स केले आहेत. काही नवे फिचर्स लवकरच दिसणार आहेत. फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट आहे. युझर्सना बांधून ठेवण्‍यासाठी अनेक नवे फिचर्स फेसबुकतर्फे सातत्‍याने देण्‍यात येतात. युझर्सना काहीतरी नवे मिळत रहावे म्‍हणून हे नवे फिचर फेसबुकने दिले आहे.

शेअर्ड फोटो अल्‍बमचे हे नवे फिचर आहे. एकापेक्षा जास्‍त जण एक फोटो अल्‍बम एकाच वेळी एडीट करु शकतील. या फिचरमधून 50 जणांना एकाचवेळी फोटो अल्‍बममध्‍ये एडीट करणे शक्‍य आहे. यापूर्वी फक्त अपलोड करणार युझरच एडीट करु शकत नाही. आता नव्‍या फिचरमुळे इतरांनाही ते शक्‍य होणार आहे. दुसरे युझर्स 200 फोटो अल्‍बम जोडू शकतात. हे फिचर काही लोकांनाच मिळाले आहे. काही दिवसांनी इतर युझर्सही त्‍याचा वापर करु शकतील.

या नव्‍या फिचरबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...