आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL फिक्सिंगमध्‍ये अडकलेल्‍या राज कुंद्राचे हे आहे आलिशान महल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनचा उद्योगपती आणि आयपीएलमधील राजस्‍थान रॉयल्‍स टीमचा सहमालक राज कुंद्राची दिल्‍ली पोलिसांनी फिक्सिंगप्रकरणी चौकशी केली. या चौकशीत राजचे सट्टेबाजीप्रकरणी नाव समोर आले आहे. राज कुंद्राचा उद्योग जगभर पसरलेला आहे. राजने दुबईमध्‍ये हिरे आणि स्‍टोन जेम्‍सच्‍या व्‍यवसायात भक्‍कमपणे पाय रोवले आहेत. ब्रिटनमधील श्रीमंतांच्‍या यादीत 198वे स्‍थान मिळवलेल्‍या राजच्‍या ऐश्‍वर्याची आणि लाईफस्‍टाईलची झलक त्‍याच्‍या घराकडे पाहिल्‍यानंतर दिसून येते.

राजने दोन लग्‍ने केली आहेत. त्‍याच्‍या पहिल्‍या पत्‍नीचे नाव कविता कुंद्रा असे आहे. कविताबरोबर घटस्‍फोट घेतल्‍यानंतर राजने शिल्‍पा शेट्टीशी लग्‍न केले. या कौटुंबिक घडामोडीचा त्‍याच्‍या व्‍यवसायावर काहीच परिणाम झाला नाही. त्‍याच्‍या व्‍यवसायाने या काळातही चांगलाच जोर धरला होता. सद्यस्थितीत राजने लंडन, दुबईसारख्‍या ठिकाणी अनेक बंगले बांधले ओहत. परंतु, राज-शिल्‍पा हे ब्रिटनमधील सरे येथे राहण्‍यास पसंती देतात. हे घर वे-ब्रिजच्‍या जवळ सेंट जॉर्ज हिल येथे आहे. सध्‍या या घराची किंमत 100 कोटी रूपयापेक्षाही जास्‍त आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या राज-शिल्‍पाच्‍या या महालाविषयी...