आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅटिनम गुंतवणूक : एक उत्तम पर्याय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोने आणि प्लॅटिनम यांच्या भावांमधील तुलनात्मक समीकरण आणि प्लॅटिनमची वाढती मागणी या दोन गोष्टींमुळे प्लॅटिनमचा आजचा बाजारभाव गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक वाटत असला तरी त्या बाबतीत आणखी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

सोने-चांदीतील ‘न भूतो न भविष्यति’
वाढीने मोठ्या प्रमाणात परतावा प्राप्त

भारतीयांना जन्मजातच सोने, चांदी, हिरे, मौल्यवान खडे वगैरेंचे अफाट आकर्षण आहे. गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये सोने आणि चांदीच्या भावांमध्ये ‘न भूतो न भविष्यति’ अशी वाढ झाली आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा प्राप्त झाला.गेल्या दोन वर्षांपासून एका वेगळ्याच मौल्यवान धातूने आपली गुंतवणूकयोग्य उपयुक्तता सिद्ध करायला सुरुवात केली आहे आणि त्याचे नाव आहे ‘प्लॅटिनम’. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने आणि चांदीच्या तुलनेमध्ये प्लॅटिनमचा इतिहास अगदीच नगण्य आहे. ज्या वेगाने त्याची वाटचाल चालली आहे, त्यावरून पुढील काही वर्षांमध्ये तो निश्चितपणे गुंतवणूकदारांच्या पोर्ट फोलिओमध्ये एक मानाचे स्थान पटकावणार आहे.

प्लॅटिनम जाणार सोन्याच्या पुढे
साधारणत: दीडपट

सन 2001च्या आसपास सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनमचा भाव जवळजवळ दीडपट होता. सोन्याच्या भावामधील तेजी आणि औद्योगिक क्षेत्रामधील मंदी या प्रमुख कारणांमुळे आज प्लॅटिनमचा भाव जवळजवळ सोन्याइतकाच आहे. किंबहुना प्लॅटिनमचा भाव सोन्यापेक्षा थोडासा वाढलाच आहे. त्यामुळे आज प्लॅटिनममधील गुंतवणूक ही एक उत्तम संधी आहे. औद्योगिक क्षेत्रातील भरभराटीबरोबर सोने आणि प्लॅटिनमच्या भावांमधील तुलनात्मक समीकरण पुन्हा एकास-दीड असे होईल.

प्लॅटिनमचे उत्पादन 10 टक्केच, मध्यमवर्गीयांतही प्लॅटिनमची क्रेझ
कमोडिटींच्या भावामधील चढ-उतार हे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असतात-मागणी आणि पुरवठा. जागतिक स्तरावर प्लॅटिनमचे उत्पादन हे सोन्याच्या तुलनेत फारच कमी, म्हणजे सुमारे 1/10 आहे (10 टन खनिजापासून 1 औंस (28.35 ग्रॅम) प्लॅटिनम तयार होते.) आणि त्याची मागणी मात्र सतत वाढत आहे. सोने आणि प्लॅटिनम यांच्या भावांमधील तुलनात्मक समीकरण आणि प्लॅटिनमची वाढती मागणी या दोन गोष्टींमुळे प्लॅटिनमचा आजचा बाजारभाव गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक वाटत असला तरी त्या बाबतीत आणखी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

सोन्याची मागणी, परकीय चलन दर वध-घटसारखा फटका प्लॅटिनमला नाही
आपल्या देशात सोन्याच्या तुलनेमध्ये आज तरी प्लॅटिनमबाबतचे वेड फार कमी आहे. आपल्या बाजारपेठेमध्ये दरवर्षी 300 ते 350 टन सोन्याची मागणी आहे आणि प्लॅटिनमची मागणी आहे फक्त 10 टन. त्यामुळे यथार्थदर्र्शी प्लॅटिनममधील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आजही मार्केट तितकेसे परिपक्व झालेले नाही. सोन्याच्या भावामधील तेजी किंवा मंदीबाबत आम जनतेला माहिती असते, भावांमध्ये पादर्शकता असते. बाजारामधील मागणी आणि परकीय चलनाचा दर जसा कमी -जास्त होतो, त्या प्रमाणात सोन्याच्या भावामध्ये वध-घट होत असते आणि त्याची ग्राहकाला कल्पना असते. प्लॅटिनमच्या बाबतीत हा प्रकार नसतो. पेढीनुसार भावांमध्ये बरीच तफावत असते.

साठ मोठ्या शहरांमध्ये प्लॅटिनमच्या
दागिन्यांची विक्री सुरू होणा

प्लॅटिनमचा बाजार आज बाल्यावस्थेत असल्याने त्यामध्ये रोकड सुलभता (Liquidity) नाही. विक्री करताना ज्या ठिकाणी खरेदी केली आहे त्याच पेढीवर जावे लागते आणि भाव फरक सुमारे 15%पर्यंत असतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्लॅटिनम मार्केटचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल (इंडिया) या संस्थेने काही कार्यक्रमांची आखणी केली आहे. त्यामधील पहिला टप्पा आहे देशभरामध्ये प्लॅटिनमची उपलब्धता वाढवायची.
नजीकच्या भविष्यामध्ये भारतातील साठ मोठ्या शहरांमध्ये प्लॅटिनमच्या दागिन्यांची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे मागणीमध्ये खचितच वाढ होईल. परंतु मोठ्या प्रमाणात मागणी वाढायची असेल तर ऑटोमोबाइल आणि पेट्रोकेमिकल या दोन उद्योगक्षेत्रांमध्ये भरभराट होणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये प्लॅटिनमचा वापर सर्वात जास्त आहे.

आजचे वापराचे प्रमाण आहे : ऑटोमोबाइल 55%, पेट्रोकेमिकल - 25%, दागिने 15% आणि इतर 5%.

प्लॅटिनम सांभाळण्याच्या जोखमीला
उत्तम पर्याय आहे एनसीईएल

सोन्यामधील गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदाराच्या इच्छेनुसार दागिने, नाणी, म्युच्युअल फंड वगैरेमध्ये गुंतवणूक करता येते. एमसीएक्स किंवा एनसीडीएक्ससारख्या वायदेबाजारांमध्ये मर्यादित पैशांमध्ये जास्त रकमेची उलाढाल करून भरपूर नफा (किंवा नुकसान) मिळवता येतो. गोल्ड ईटीएफ किंवा एनएसईएलमार्फत कागदी सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते. प्लॅटिनमच्या बाबतीत आज तरी मर्यादित पर्याय आहेत. एक तर दागिने किंवा नाणी/ बार किंवा एनसीईएल (National Spot Exchange Ltd.) सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी, ज्यांची जास्त परतावा मिळवण्याची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये कधीकाळी दागिने बनवण्याची इच्छा झाली तर त्या वेळी प्लॅटिनम हाताशी असावे अशी धारणा आहे; परंतु ते सांभाळून ठेवण्याची जोखीम नको आहे, त्यांच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे एनसीईएल.
या बाजारामध्ये खरेदी केलेले प्लॅटिनम ग्राहकाच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी नाही. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते रात्री 11.30 पर्यंत केव्हाही खरेदी/विक्री करता येते आणि तीही घरात बसून, फोनवर. बाजारात प्रत्यक्ष जायची गरज नाही. खरेदी/ विक्रीमधील भावफरक 1 रु.च्या आसपास असतो. कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त 1 किलोपर्यंतचा सौदा करता येतो आणि शुद्धतेची हमी असते 999.5. सौदा करण्यापूर्वी 1010 रक्कम तारण म्हणून जमा करावी लागते आणि सौद्याच्या तिस-या दिवशी 11 वाजेपर्यंत बाकी 90% रकमेचा भरणा करावा लागतो. विक्रीच्या बाबतीत सौद्याच्या तिस-या दिवशी 12 वाजेपर्यंत मालाची डिलिव्हरी द्यावी लागते. त्याच दिवशी पे आऊटला खरेदीदाराचा माल त्याच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतो आणि विक्रेत्याला त्याचे पैसे मिळतात.

प्लॅटिनम खरेदी,
सौद्यात व्हॅट नाही

प्रत्यक्षात प्लॅटिनमची डिलिव्हरी पाहिजे असेल तर तीही तरतूद आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद आणि जयपूर येथे डिलिव्हरी सेंटर्स आहेत. बाजारातील सौद्यांमध्ये व्हॅट नसतो, त्यामुळे त्या रकमेचा भरणा केला की प्रत्यक्षात प्लॅटिनम मिळू शकते.नवीन वर्षामध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी अतिशय उपयुक्त असा आहे.

nupuradilip.samant@yahoo.co.in