आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poor Can Also Open Its Account In Foreign Bank Reserve Bank

गरीबही उघडू शकतील विदेशी बँकांमध्ये खाते - रिझर्व्ह बँक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनादेखील एचएसबीसी, सिटी बॅँक, स्टॅँडर्ड चार्टर्ड बॅँक या सारख्या आघाडीच्या विदेशी बॅँकांमध्ये शून्य बचत खाते उघडणे तसेच मोफत एटीएम कार्ड सुविधा प्राप्त करणे
शक्य होणार आहे. ‘मूलभूत बॅँक बचत ठेव खात्या’साठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे ही भारतात शाखा असलेल्या विदेशी बॅँकांसह सर्व शेड्युल्ड व्यावसायिक बॅँकांसाठीदेखील लागू असतील असे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे.
‘मूलभूत बॅँक बचत ठेव खाते ’योजनेंतर्गत अगदी गरीब किंवा समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही बॅँकेत शून्य शिल्लक खाते उघडू शकते. अशा प्रकारचे खाते उघडताना ग्राहकाला कोणत्याही प्रकारची प्रारंभिक अनामत रक्कम बॅँकेत ठेवण्याची गरज नसल्याचे रिझर्व्ह
बॅँकेने म्हटले आहे.