आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poor Get Rice 5 Ruppes Kilo,wheat 3 Kilo Recomand By Committee

गरिबांना 5 रु. दराने तांदूळ, तीन रु. किलोप्रमाणे गहू द्या- अन्न सुरक्षाविषयक समितीची शिफारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - अन्न सुरक्षा विधेयकात देशातील 67 टक्के गरीब लोकांना 5 किलो स्वस्त धान्याचा पुरवठा करण्याची तरतूद असावी, असे या विधेयकावरील संसदीय समितीने सुचवले आहे.
समितीने लोकसभा सभापतींना गुरुवारी अहवाल सादर केला. लाभार्थींना तीन रुपये किलोप्रमाणे तांदूळ, दोन रुपये दराने गहू व एक रुपया दराने इतर धान्य मिळावे, असे अहवालात नमूद आहे. सध्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सात किलो गहू 4.14 रुपये प्रतिकिलो दराने तर सात किलो तांदूळ 5.65 रुपये प्रतिकिलो दराने पुरवठा केला जातो. तर दारिद्र्य रेषेखाली नसणा -या कुटुंबांसाठी किमान हमी भावाने तीन किलो धान्य देण्याची तरतूद विधेयकाच्या मसुद्यात आहे. काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने विधेयकात मोठे बदल सुचवले आहेत. लाभार्थी कुटुंबाला सदस्यामागे पाच किलो धान्य पुरवठा करावा, असेही समितीने सुचवले आहे.
अन्नमंत्री के. व्ही थॉमस म्ङणाले, अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालातील सूचनांचा अभ्यास करू, नंतर कॅबिनेटकडे पाठवू.