आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Portable PF Account News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोर्टेबल पीएफ खाते १६ ऑक्टोबरपासून मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापक कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना कायमस्वरूपी भविष्य निधी खाते क्रमांक (यूएएन) देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ करणार आहे. याशिवाय सरकार कायमस्वरूपी कर्मचारी ओळख क्रमांक (लेबर आयडेंटिफिकेशन क्रमांक - लिन) देणार आहे. यामुळे सर्व प्रक्रिया सुलभ होणार आहे. तसेच कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणात असलेल्या विविध एजन्सी तसेच संस्थांद्वारे होणा-या कर्मचारी सर्वेक्षणात यामुळे पारदर्शकता येणार आहे.

कामगार मंत्रालयाच्या योजनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी लिन वेब पोर्टल आणि यूएएन सादर करणार आहेत. एका वरिष्ठ अधिका-याच्या मते कामगार सचिवांनी यूएएन आणि लिन सादर करण्यासंदर्भात एक बैठक बोलावली होती. पंतप्रधान मोदी यांना यूएएन तसेच लिन वाटप शुभारंभासाठी बोलावण्यात येणार आहे. याप्रसंगी कामगारमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कामगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यूएएनच्या माध्यमातून पीएफ खात्याची माहिती मिळेल तसेच त्यातील व्यवहार तसेच पेन्शन सुविधेबाबत माहिती मिळणार आहे. यूएएन धारकांसाठी त्यांच्या पूर्ण करिअरसाठी वैध राहील आणि त्याचा वापर देशभरात कोठेही करता येईल. अशा रीतीने संघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी नोकरी बदलल्यानंतरही पीएफ खाते बदलासाठी अर्ज करावा लागणार नाही.
१.८० कोटी खातेधारक
ईपीएफओकडे सध्या १.८० कोटी कर्मचा-यांची बँक खाती, ८६.९ लाख कर्मचा-यांचे पॅन क्रमांक आणि २८.२ लाख कर्मचा-यांचे आधार कार्ड याची माहिती आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या ४.१७ कोटी सदस्यांना यूएएन देण्याची ईपीएफओची योजना आहे. प्रत्येक कर्मचा-यासाठी लिन अर्थात कर्मचारी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे.