आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Post Impressive Sale By Flipkart And Snapdeal Other Retailers Plan For E Commerce Venture

EXCLUSIVE: V2 रिटेल लवकरच करणार ई-कॉमर्समध्ये एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 25 हजार टीव्ही, 5 लाख मोबाइल फोन आणि 5 लाखपेक्षा जास्त बूट आणि कपडे अवघ्या 10 तासांत वेबसाइटच्या माध्यमातून विक्री करण्याचा एक ई कॉमर्स कंपनीने ऐतिहासिक विक्रम प्रस्तापित केला आहे. 'फ्लिपकार्ट' आपल्या ग्राहकांसाठी बिग ऑफेर्स देऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'फ्लिपकार्ट' गेल्या दोन दिवसांपूर्वी 'बिग बिलियन डे' ऑफर्स दिली होती. या ऑफर्सला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. तसेच 'स्नॅपडील'नेही अशाच प्रकारची ऑफर दिली होती. दोन्ही कंपन्यांनी अवघ्या 10 तासांच्या कालावधीत सुमारे 1200 कोटी रुपयांचा व्यवहार केला.

ई कॉमर्स इंडस्ट्रीतील 'फ्लिपकार्ट' आणि 'स्नॅपडील'ची यशस्वी घौडदोड पाहून देशातील अन्य कंपन्या चक्रावून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील दिग्गज कंपनी 'V2 रिटेल' लवकरच ऑनलाइन बिझिनेसमध्ये पाऊल ठेवणार आहे. मार्च 2009 पर्यंत देशात एकूण V2 चे 'विशाल मेगामार्ट' या नावाने 182 स्टोअर्स होते.

V2 कंपनीने ऑनलाइन रिटेल बिझिनेसमध्ये पदार्पण करण्‍याची योजना आखल्याचे कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आर.सी.अग्रवाल यांनी 'मनी भास्कर'शी बोलताना सांगितले. 'फ्लिपकार्ट' आणि 'स्नॅपडील'च्या 'बिग बिलियन डे' ऑफर्समुळे ई- कॉमर्समध्ये क्षेत्रात एंट्री करण्यासाठी अनेक कंपन्या उत्साहीत आहेत. कमी गुंतवणुकीत उत्तम मार्जिन असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अग्रवाल यांच्या मते, ई कॉमर्सच्या बिझनेस मॉडेलमध्ये ग्राहकांना चांगली बचत होते.

पुढील स्लाइड्‍समध्ये वाचा, 'विशाल मेगास्टोअर्स'च्या बिझनेसविषयी...

(टीप- वरील छायाचित्र सादरीकरणासाठी वापरण्‍यात आले आहे.)