आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या फेरसमभाग विक्रीस प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विद्युत क्षेत्रात कार्यरत असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने सार्वजनिक समभाग विक्रीसाठी पुन्हा भांडवल बाजारात प्रवेश केला आहे. या फेर सार्वजनिक समभाग विक्रीतून कंपनीला 7,083 कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित असून त्याचा उपयोग हा कंपनीच्या 27 प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यासाठी होणार आहे.
पॉवरग्रीडमधील 17 टक्के भागभांडवल विक्रीसाठीचा एफपीओ संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून त्याची विक्री पाच डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कर्मचारी तसेच किरकोळ गुंतवणुकदारांसाठी ही विक्री सहा डिसेंबरला बंद होत आहे. या फेर सार्वजनिक समभाग विक्रीतून मिळणा-या निधीचा उपयोग 27 प्रकल्पांना अर्थपुरवठा करण्यासाठी होणार आहे. यामुळे पारेषण जाळे अधिक भक्कम होण्यास मदत होऊ शकेल असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.एन. नायक यांनी सांगितले. कंपनी गरजा भागवण्यासाठी देखील या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
प्रति समभाग 85 ते 90 रुपये दरपट्टा : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने एकूण 78.70 कोटी समभाग विक्रीसाठी आणले असून त्यासाठी प्रती समभाग 85 ते 90 रुपये दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. पॉवर ग्रीडच्या 17 टक्के भांडवली हिस्सा विक्रीमध्ये सरकारच्या समभागांचे प्रमाण चार टक्क्यांपर्यंत असेल. या भाग विक्रीतून कंपनीला 5,717 कोटी रुपये तर सरकाला जवळपास 1,758 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सिटीग्रूप, आयसीआयसी्राय सिक्युरिटीज, युबीएस, एसबीआय कॅप्स आणि कोटक महिंद्र या समभाग विक्रीसाठी मर्चंट बॅँकर्स म्हणून काम पाहत आहे. या अगोदर नोव्हेंबर 2010 मध्ये सरकारने इतक्याच भांडवली हिश्शाची विक्री प्रती समभाग 90 रुपये या प्रमाणे केली होती. त्यानंतर आता पॉवर ग्रीडची फेर सार्वजनिक समभाग विक्री होत आहे.