आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजनिर्मिती कंपन्यांच्या मागण्या विचारात घेऊ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोळशाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन वीज दरात वाढ करण्याबाबत देशातील वीजनिर्मिती कंपन्यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून त्याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इलेक्रामा 2012’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी
ते बोलत होते.
कोळशाच्या किमतीत बेसुमार वाढ झाल्यामुळे विद्युत प्रकल्पांमधील विजेच्या दरात वाढ करण्याची मागणी विद्युत निर्मिती कंपन्यांनी केली आहे. यावर आपले मत व्यक्त करताना ऊर्जामंत्री शिंदे यांनी विद्युत निर्मिती कंपन्यांच्या मागण्यांचा काळजी आणि सहानभूतीपूर्वक विचार करण्यात
येईल असे स्पष्ट केले.
विद्युत निर्मिती कंपन्यांना भेडसावणाºया समस्यांवर चांगल्यात चांगली उकल कशी निघेल हे बघतानाच विकासकांना तोटा होणार नाही तसेच ग्राहकांवरही जास्त भार येणार नाही याकडेही लक्ष देण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
विजेच्या निर्मितीमध्ये ऊर्जा उपकरणे हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ऊर्जा उपकरणांवर आयात शुल्क लागू करण्याच्या मागणीवर देखील विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया ऊर्जा प्रकल्पांतील ऊर्जा उपकरणांच्या आयातीवर शुल्क लावण्याची शक्यता आहे.
देशाच्या विद्युत निर्मिती क्षमतेत लक्षणीय भर पडल्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगून शिंदे पुढे म्हणाले की, विद्युत क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कोळसा आणि वायू पिछाडीवर पडले आहे. परंतु येत्या काळात या परिस्थितीत सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विजेचे दर वार्षिक आधारावर स्वयंचलितरित्या वाढवण्यासाठी राज्यांना सूचना देण्यात आल्या असून पुढील वर्षापासून या प्रक्रियेची अमलबजावणी होईल. काही राज्यांनी गेल्या सहा ते सात वर्षात विजेचे दर वाढवलेले नाही पण काहींनी आता विजेचे दर वाढवण्यास सुरूवात केली आहे अशी माहितीही शिंदे यांनी या वेळी दिली.