नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी सरकारी बॅंक भारतीय स्टेट बॅंकेच्या (SBI) कॉर्पोरेट व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) प्रदीप कुमार यांची नियुक्त करण्यात आली आहे.
प्रदीप कुमार यांची नियुक्ती 27 डिसेंबरपासून निश्चित केल्याचे SBI च्या सूत्रांनी सांगितले. तसेच ग्रुप एक्झिक्युटीव्ह पदाचाही अतिरिक्त पदभार कुमार सांभाळणार आहे. सांख्यिकी विषयात उच्च पदवी प्राप्त केलेल्या कुमार यांनी 1976 साली प्रोबेशनरी अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी SBI ची अनेक महत्त्वपूर्ण पदेही भूषवली आहेत. SBI च्या अमेरिकेतील विस्तारातही कुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.