आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणवदांची नजर आता मान्सूनवर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या घटत्या किमती आणि चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज या बाबी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी साह्यकारी ठरू शकतात, अशी अपेक्षा अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्या वार्षिक परिषदेत त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. हवामान खात्याने 2012-13 या हंगामात सरासरी पर्जन्यमानाचे भाकीत केले आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आरबीआय लवकरच प्रमुख व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी अडचणीतील अर्थचक्राला बळ देणा-या आहेत. त्यामुळे आगामी काळात चांगली प्रगती साधता येईल, अशी अपेक्षा मुखर्जी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, खाण क्षेत्रातील मरगळ दूर होईल, वीजनिर्मिती चांगल्या प्रमाणात होईल तसेच गुंतवणुकीच्या पातळीत सुधारणा होऊन अर्थव्यवस्थेला वेग येणार आहे. 2011-12 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत एकही लक्षणीय ‘निकाल’ नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अधिक सुधारणेस वाव नाही : गेल्या वेळेसच्या मंदीनंतर अत्यंत कमी काळात सध्याची अस्थैर्याची स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याच्या राबवण्यात येत असलेल्या आर्थिक सुधारणांशिवाय नव्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यास सध्या पुरेसा वाव नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
जीडीपीचे आकडे निराशाजनक
भारतीय अर्थव्यवस्थेने 2009-10 आणि 2010-11 या आर्थिक वर्षांत 8.4 टक्के दराने आर्थिक प्रगती साधली होती. मात्र, 2011-12 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) घट येऊन ते 6.5 टक्क्यांपर्यंत घसरले. हे आकडे निराशाजनक असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे.