Home | Business | Gadget | pre-order-price-for-nokia-e6-in-india

दर महिना 6 हजारांने विकत घेता येईल 'नोकिया E 6 '

बिझनेस ब्युरो | Update - Jun 15, 2011, 03:47 PM IST

भारतामध्ये नोकिया E 6 इन्स्ट्रॉलमेंटवरही खरेदी करता येणार आहे.

  • pre-order-price-for-nokia-e6-in-india

    तुम्हाला मोबाईल चेंज करण्याची इच्छा असेल तर नोकियाची एक बेस्ट ऑफर तुमच्या साठीच आहे. भारतामध्ये नोकियाने आपला सगळ्यात स्मार्टफोन नोकिया E 6 वर आकर्षक ऑफर जाहिर केली आहे.

    या मोबाईलची भारतामधील किंमत 17,999 रुपये असणार आहे. हा मोबाईल जर तुम्हा खरेदी करु इच्छित असाल तर प्री ऑर्डरवर तुम्हाला इन्स्ट्रॉलमेंटवरही खरेदी करता येणार आहे. आणि त्यातील सर्वात आकर्षक बाबा म्हणजे त्यासाठी कोणताही एक्सट्रा चार्ज कंपनी घेणार नाही. एकूण तीन हप्त्यांच्या मुदतीत हा मोबाईल घेता येईल. त्यासाठी प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये द्यावे लागणार आहे.

    कपंनीने नोकिया E 6 हा बीझनेस फोन म्हणून सादर केला आहे. यात क्युरटी की पॅड सोबतच टच स्क्रिनची सुविधा आहे. E 6 मध्ये 8 मेगापिक्सल कॅमेरा, 8 जीबी मेमरी, वाय-फाय, ब्लुटूथ 3.0 हे आणि यासारखे अनेक चांगले फिचर्स असणार आहेत. नोकिया E 6 हा सिल्वर, ब्लॅक, आणि व्हाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.


Trending