आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरीसाठी तिशीतील तरुणांना प्राधान्य, भारत कौशल्य विकास अहवालातील निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काैशल्य विकासावर दिलेला भर लक्षात घेऊन अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये नाेकरी देणा-या ७२ टक्के व्यक्ती ३० वर्षे किवा त्या खालच्या वयाेगटातील कर्मचा-यांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. २०२० पर्यंत काम करणा-या वयाेगटात जवळपास ६० टक्के लाेकसंख्या समाविष्ट हाेणार असल्याने तरुण उमेदवारांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.
‘सीआयआय’च्या मुंबईत झालेल्या काैशल्य विकासावरील सहाव्या परिषदेत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भारत काैशल्य विकास अहवाल २०१५’ मध्ये व्यक्त करण्यात आलेला हा निष्कर्ष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. व्हीबाॅक्स, ग्लाेबल टॅलेंट असेसमेंट कंपनी, पीपलस्ट्राँग यांच्या सहकार्यातून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये २९ राज्यांत नाेकरी देण्याचा चढता आलेख दिसून येताे.
पर्यटन क्षेत्र आघाडीवर
रोजगारक्षम कौशल्याच्या वर्गामध्ये सर्वाधिक महत्त्व असलेल्या राज्यांमध्ये राजस्थान, आंध्र
प्रदेश, हरियाणा, केरळ आणि ओडिशा यांचा नव्याने प्रवेश झाला आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या दहा विभागांमध्ये हाॅस्पिटॅलिटी, पर्यटन ही क्षेत्रे नाेक-या देण्यात आघाडीवर असून, बीएफएसआय, मूलभूत क्षेत्रात २५ टक्के नाेक-या अपेक्षित आहेत.
निवडीसाठी सोशल मीडियाचा वापर
साेशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार निवडीचे प्रमाण वाढले असून ते गेल्या वर्षातल्या सहा टक्क्यांवरून आता ते १२ टक्क्यांवर गेले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. कॉर्पोरेट वर्गासमोर लिंगवैविध्य राखण्याचे आव्हान जास्त असल्याचे व्हीबॉक्स-पीपलस्ट्राँग-लिंक्डइन सर्वेक्षणात मत व्यक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षातल्या अहवालाच्या तुलनेत विविध उद्योगांमध्ये नेमल्या जाणा-या पुरुषांमागे स्त्रियांची टक्केवारी ३८ टक्के झाली आहे.