आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसयूव्हींना नव्या रियोची टक्कर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्पोर्र्ट्स युटिलिटी व्हेईकल्स (एसयुव्ही) बाजारात सध्या सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेत आता प्रिमियरच्या नव्या डिझेल रियो एसयुव्हीची भर पडली आहे. विशेष म्हणजे या रियो एसयुव्हीला फियाटने पुरवलेले शक्तिशाली ‘सीआरडीआय 4’ मल्टीजेट डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षात प्रिमियरने 1.3 लिटर क्षमतेचे मल्टीजेट इंजिन असलेली ही रियो एसयुव्ही 6,19,000 ते 6,47,000 रुपयांच्या (एक्स शोरुम पुणे) इतकी आकर्षक ठेवण्यात आली आहे. या नव्या इंजिनामुळे रियो शहरात आणि शहराबाहेरही प्रती लिटर 19 किलोमीटरचे अंतर कापू शकते. नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन रियो काळा, पांढरा, लाल आणि चंदेरी या चार रंगात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या प्रिमियरचे विविध देशांमध्ये एकूण 55 विक्री जाळे पसरले असून येत्या डिसेंबरपर्यंत ही संख्या 100 पर्यंत वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. त्याचबरोबर ‘पास’ (प्रिमियर ऑथॉराईज्ड सर्व्हिस स्टेशन) या नावाने देशभरात 200 सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत.
मारुती सुझुकीची एट्रिगा तर अलिकडेच बाजारात आलेली रिनॉल्ट डस्टर तसेच महिंद्र बोलेरो, टाटा सफारी या सर्व एसयुव्हींच्या मांदीयाळीत आता रियो या आणखी एका स्पर्धकाची भर पडली आहे.