आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premium Train Will Let You Feel Like Airoplan New Delh

17 हजारांत विकले गेले रेल्वे तिकीट; जाणून घ्या या \'कन्फर्म तिकीट सुविधेबाबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नववर्षानिमित्त दिल्ली- मुंबई मार्गावर 'प्रीमियम ट्रेन' सुरु करून रेल्वे प्रशासनाने मोठी कमाई केली आहे. या मोठ्या कमाईतून उत्साहित झालेल्या रेल्वे प्रशासनाने आगामी होळी सणानिमित्त देशभरत 'प्रीमियम ट्रेन' सुरु करण्याची तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने यासाठी 21 मार्ग निश्चित केले आहे. विमानासारखे डायनामिक तिकीट भाडे असलेल्या या आलिशान रेल्वेत अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीने 'बिझनेस भास्कर'शी बोलाताना सांगितले, की ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त दिल्ली- मुंबई यामार्गावर प्रीमियम ट्रेनने 12 फेर्‍या मारल्या होत्या. या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला 43 टक्के जास्त उत्पन्न मिळाले होते. एक जानेवारी 2014 रोजी सोडण्यात आलेल्या रेल्वेत एसी टू टायरचे 219 बर्थ आणि एसी थ्री टायरचे 746 बर्थ होते. यातून रेल्वे प्रशासनाला 37.43 लाख रुपये मिळाले होते.
उल्लेखनिय म्हणजे, डिसेंबरच्या हॉलीडे सीजनमध्ये पायलेट प्रोजेक्ट रेल्वेने प्रीमियम ट्रेन धावली होती. या रेल्वेचे एसी-2 टायरचे एका प्रवाशाचे तिकीट 17 हजार रुपये आणि एसी-3 टायरचे त‍िकीट 12 हजार रुपयांत विकले गेले होते. राजधानी एक्सप्रेसच्या तिकीटाच्या तुलनेत 7 टक्के जास्त होते. भविष्यात धावणार्‍या प्रीमियम ट्रेनकडून रेल्वे प्रशासनाला अशाच प्रकारच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रीमियर ट्रेनच्या आधुनिक सेवेबाबत...