आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Sector Reservation To Curb Industry Competitiveness

खासगीत आरक्षण, कंपन्यांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात खासगी क्षेत्रात आरक्षणाचे संकेत दिल्याने उद्योग जगतात चिंता व्यक्त होत आहे. अशा स्वरूपाच्या पावलांमुळे उद्योग जगताच्या प्रतिस्पर्धात्मकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मत उद्योग जगताने व्यक्त केले आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी उद्योग जगताने दर्शवली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीजचे (सीआयआय) क्रिस गोपाळकृष्णन यांनी सांगितले, काँग्रेसशी आम्ही या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. कारण अशा स्थितीत असे कोणतेही पाऊल उचलल्यास उद्योग जगताच्या प्रतिस्पर्धात्मक घटकांवर अनिष्ट परिणाम होईल. हीरो मोटोकॉर्पचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील कांत मुंजाल यांनी सांगितले, भारतीय उद्योग जगताने सकारात्मक घडामोडींत नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

खासगी क्षेत्रातील आरक्षणाला मात्र उद्योग जगताचा विरोध आहे. प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक सुधारणांची गरज आहे आणि उद्योग जगताने नेहमीच या दिशेने पावले टाकली आहेत. असोचेमच्या मते, खासगी क्षेत्रासाठी स्वेच्छिक पातळीवर सकारात्मक पावलांना नेहमीच संघटनेचा पाठिंबा आहे. पीएचडीसीसीआयचे अध्यक्ष शरद जयपुरिया यांनी काँग्रेसचा जाहीरनामा आगामी काळातील दृष्टीने महत्त्वाचा आहे. सीसीआयच्या मते आरोग्य, पेन्शन आणि घरासंबंधीच्या जाहीरनाम्यातील तरतुदी चांगल्या आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उद्योग क्षेत्रासाठी वस्तू तसेच सेवाकर (जीएसटी) तसेच प्रत्यक्ष कर संहिता (डीटीसी) आणण्याचे व ते एका वर्षात लागू करण्याचा दावा करण्यात आला आहे. फिक्कीच्या मते, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक बाबींवर चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. फिक्कीचे अध्यक्ष सिद्धार्थ बिर्ला यांच्या मते, सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन अधिकार्‍यांना पावले टाकावी लागतील. येत्या तीन वर्षांत विकास दर 8 टक्के आणि 10 कोटी रोजगाराच्या संधीचा दावा काँग्रेसने या जाहीरनाम्यात केला आहे.

उद्योग जगताचा सल्ला
० देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन करावा सर्वसमावेशक विकास
० जीएसटी आणि डीटीसी लागू करण्याच्या दाव्यावर कंपनी जगताला आनंद
० खासगी क्षेत्रातील आरक्षणामुळे स्पर्धात्मक घटकांवर परिणामांची शक्यता.