आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफावसुलीचा बाजाराला फटका; सेन्सेक्स, निफ्टीत उच्चांकावरून घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जोरदार खरेदीमुळे सातत्याने नवनवे उच्चांक गाठणा-या शेअर बाजाराला शुक्रवारी नफावसुलीचा फटका बसला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी या आठवड्यात सर्वकालीन उच्चांक नोंदवले. शुक्रवारी मात्र गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा पदरात पाडण्यावर
भर दिल्याचे दिसून आले. धातू, भांडवली वस्तू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली. सेन्सेक्स ४७.२५ अंकांनी घसरून २७,८६८.६३ वर आला. तर निफ्टी १.३० अंकांच्या घसरणीसह ८३३७.०० वर स्थिरावला.
इंडिया रेटिंगने सकल राष्ट्रीय उत्पादन ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवल्याने बाजारात नकारात्मक कल दिसून आला. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २२ समभाग कोसळले, तर आठ समभाग चमकले. आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र कल, तर युरोपातील प्रमुख बाजारात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.
नकारात्मक कल
ओईसीडीने जीडीपी दर घटण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. त्यामुळे घसरण झाली.
जयंत मंगलिक, अध्यक्ष (रिटेल), रेलिगेअर सेक्युरिटीज.
टॉप लुझर्स : भेल, गेल, सेसा स्टरलाइट, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, एसबीआय, एम अँड एम, बजाज ऑटो, कोल इंडिया, टाटा स्टील, विप्रो, सिप्ला, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस
टॉप गेनर्स : डॉ.रेड्डीज लॅब, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, एचयूएल, ओएनजीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस.