मागील काही महिन्यांमध्ये सोन्यात आलेली वाढ ही दिर्घकाळ टिकणारी दिसत नाही. त्यामुळे सध्या आलेली वाढ लक्षात घेऊन दिर्घकाळासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे चुकीचे ठरू शकते. कारण येणार्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मागील काही महिन्यांमध्ये सोन्यात आलेली वाढ ही दिर्घकाळ टिकणारी दिसत नाही. त्यामुळे सध्या आलेली वाढ लक्षात घेऊन दिर्घकाळासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे चुकीचे ठरू शकते.
मागील काही दिवसांमध्ये इराकमध्ये सुरू असलेल्या तणावजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने 1330 डॉलर एवढा उच्चांक गाठल्यानंतर सोने सध्या 1327 डॉलर प्रति पाऊंड स्थिर झाले आहे. तसेच घरगुती बाजारपेठेत सोन्याचा व्यापार अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू आहे. दिल्लीच्या हाजीर बाजारामध्ये सोने काल 225 रुपयांची उसळी घेत बंद झाले. तर शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सोने पुढील एका आठवड्यात सध्याच्या किंमतीपेक्षा 500 रुपयांनी घसरण्याचे संकेत दिले आहेत.
जानकारों की राय
इंडिया इन्फोलाईनच्या हितेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील युध्द सदृश्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरांमध्ये जेवढी वाढ व्हायची होती तेवढी झाली आहे. आता सोने बजेटपर्यंत एका विशिष्ट स्तरापर्यंत राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोने 27,500 ते 28,000 रुपयांदरम्यान राहील. मात्र सरकारकडून जर अपेक्षेपेक्षा जास्त आयात शुक्ल कपात केली गेली तर हे सोन्याच्या घसरणीचे एक कारण होऊ शकते.
पॅराडिगमचे बिरेन वकील यांच्या मते, इतक्या कमी काळात सोन्यामध्ये जास्त चढउतार पहायला मिळणार नाही. मात्र, बजेटपर्यंत सोने 27,200 रुपयांपर्यंत घसरू शकते. तसेच सरकारकडून लावण्यात आलेल्या आयात शुल्कात कपात करण्यामने सो्न्यावर पडलेला प्रभाव जास्त दिवसांपर्यंत राहणार नाही. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने पुन्हा 29,500 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत पोहचू शकते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या...
का झाली सोन्यामध्ये घसरण..
(फोटो केवळ सादरीकरणासाठी घेण्यात आले आहेत.)