आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्रीने बाजारात घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम धातू, स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्राशी निगडित समभागांच्या नफारूपी विक्रीत सेन्सेक्स 40 अंकांनी घसरला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने चांगली उसळी घेत 18,920.90 अंकांची पातळी गाठली होती, परंतु जागतिक शेअर बाजारातील नरमाईचा बाजारावर परिणाम होऊन पहिल्या तासातच सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला. त्यानंतर दिवसभरात सेन्सेक्समध्ये अनेक वेळा सुधारणा होण्याचा कल दिसून आला. परंतु सततच्या नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्सचा पारा वर जाऊ शकला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स 40.56 अंकांनी घसरून 18,877.96 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 21.20 अंकांनी घसरून 5698.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला. विक्रीत प्रामुख्याने जिंदाल स्टील, हिंदाल्को, टाटा स्टील, स्टर्लाइट या समभागांना फटका बसला.