आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Profit Making Shut Down, Sensex Down By 146 Numbers

नफेखोरीचा तेजीला फटका,सेन्सेक्स 146 अंकांनी घसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चांगल्या पातळीवर असलेल्या बाजारात गेल्या दोन सत्रांपासून नफेखोरीचा बाजार उधाणाला आहे. बुधवारीही ठरावीक समभागांच्या विक्रीकडे गुंतवणूकदारांचा कल राहिला. त्यामुळे सेन्सेक्स 146.21 अंकांनी गडगडून 20,708.71 वर बंद झाला. निफ्टी 40.9 अंकांच्या घसरणीसह 6160.95 वर स्थिरावला. पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचा फटकाही बाजाराला बसला.तिकडे रुपयाने मात्र डॉलरची यथेच्छ धुलाई करत एक महिन्याचा उच्चांक गाठला.
विक्रीच्या मा-यामुळे सेन्सेक्सला या आठवड्यातील सर्वात मोठी घसरण अनुभवावी लागली. रिअ‍ॅल्टी, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील समभागांना विक्रीचा फटका बसला. आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी समभागातील घसरणीने निर्देशांकाच्या घसरणीत 88 अंकांचा वाटा उचलला. आयटी क्षेत्रातील इन्फोसिस आणि विप्रो या समभागांच्या तेजीने घसरण कमी केली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 समभाग घसरले. बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी आठ निर्देशांक गडगडले.
आशियातील प्रमुख बाजारात घसरण दिसून आली. इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया बाजार घसरले, तर चीन व तैवान बाजारात तेजी होती. युरोपातील बाजारात मात्र सकारात्मक वातावरण होते. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनचे बाजार वधारले.
कच्चे तेल वधारले :
बेंचमार्क यूएस क्रूड तेलाच्या किमतीत तेजी आल्याने देशातील बाजारात घसरण झाल्याचे निरीक्षण ब्रोकर्सनी नोंदवले. इन्व्हेन्टरीत घसरण झाल्याने क्रूड तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्या. सत्राअखेरीस डब्ल्यूटीआय कच्चे तेल 97.3 डॉलर प्रती बॅरल या पातळीत होते.
रुपया 62.05 वर
निर्यातदार, बँका यांच्याकडून डॉलरची जोरात विक्री झाल्याने रुपयात तेजी आली. बुधवारी रुपयाने डॉलरची यथेच्छ धुलाई करत 31 पैशांच्या कमाईसह 62.05 पातळीपर्यंत मजल मारली. रुपयाचा हा महिन्याचा उच्चांक आहे.
आंतरबँक विदेशी मुद्रा विनिमय बाजारात सत्राच्या प्रारंभी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले होते. नंतर मात्र डॉलरच्या विक्रीचा मारा झाल्याने रुपयाला बळ मिळाले. अल्पारी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ प्रमित ब्रह्मभट्ट यांनी सांगितले की, पॉवरग्रीडच्या एफपीओच्या खरेदीसाठी विदेशी गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केल्याचा फायदा रुपयाच्या मूल्यवर्धनाला झाला.
नफेखोरीकडे कल
नफा वसुली आणि अमेरिका फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत कपात करण्याची शक्यता या दोन बाबींमुळे बाजारात विक्रीकडे गुंतवणूकदारांचा कल राहिला.
राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टपोलिओ
टॉप लुझर्स
हिंदोल्को इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, ओएनजीसी, टाटा मोटर्स
टॉप गेनर्स
टाटा पॉवर, विप्रो, टाटा स्टील, जिंदाल स्टील.