आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Profit Taking Weighs On Indian Shares After Record Highs

नफा वसुलीनंतरही निर्देशांकांचा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई शेअर बाजारात गुरुवारी चढ-उताराचा सीसॉ रंगला. विक्रमी पातळीवर बाजारात नफा वसुली मोठ्या प्रमाणात दिसून आली. ऊर्जा, भांडवली वस्तू, रिअ‍ॅल्टी, रिफायनरी आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी तर फार्मा, आयटी, तंत्रज्ञान व एफएमसीजी कंपन्याच्या समभागांची विक्री दिसून आली. सत्राअखेर सेन्सेक्स 12.99 अंकांच्या वाढीसह 22,715.33 या नव्या उच्चांकावर बंद झाला. निफ्टी किरकोळ वाढीसह 6796.40 वर स्थिरावला.

फार्मा, आयटी व एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्सच्या वाढीला आळा बसला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्था 2014 मध्ये 5.4 टक्के दराने वाढ करण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी बाजारातून 1043.86 कोटींची खरेदी केली. रेलिगेअर सेक्युरिटीजचे किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मंग्लिक यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवलेल्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांत उत्साह दिसून आला. शॉर्ट टर्मचे उद्दिष्ट असणार्‍यांनी नफा वसुलीवर भर दिल्याचे दिसले.

टॉप गेनर्स : टाटा पॉवर, एनटीपीसी, भेल, टाटा मोटर्स, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर.
रुपयाला तरतरी : गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने सात पैशांची कमाई करत 60.07 पर्यंत मजल मारली.