आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protest In Front Of Hcl Company In Nationwide Offices

देशात एचसीएल कार्यालयांसमोर अभियंत्‍यांची निदर्शने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नोकरीची हमी मिळूनही नेमणूक पत्र न मिळाल्याने एचसीएल टेक्नोलॉजीच्या पुण्यासह देशभरातील पाच कार्यालयांच्या ठिकाणी अभियंत्या तरुणांनी सोमवारी निदर्शने केली.

नोएडा, चेन्नई, बंगळूर, पुणे आणि हैद्राबाद या ठिकाणी ही निदर्शने झाली. कंपनीने सप्टेंबर महिन्यात या उमेदवारांना नोकरी देऊ अशी सूचना दिली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही नेमणूक पत्रे देण्यात आले नाहीत. वर्ष उलटूनही नेमणूक पत्र न मिळाल्याने उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. ऑगस्टमध्ये त्यावर निर्णय होईल असे कंपनीतर्फे सांगण्यात येते आहे. एचसीएल टेक्नोलॉजीऐवजी एचसीएल इन्फ्रा कंपनीत कमी वेतनावर रुजू होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र तो अनेकांना मान्य नाही. वेतनात एक लाख रुपयाचा फरक असल्याने अनेकजण नाराज आहेत. या सर्व पदवीधरांना त्यांच्या महाविद्यालयात निवडण्यात आले होते. काही तरुणांनी वेतन न घेता तीन महिने काम करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र त्यांना एचसीएल टेक्नोलॉजीमध्येच नोकरी हवी आहे.