आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Provident Fund News In Marathi, Divya Marathi, Business

भविष्य निर्वाह यूएएनसाठी बँक खाते क्रमांक अनिवार्य, ईपीएफओचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) आता युनिव्हर्सल खाते क्रमांक (यूएएन) देणार असून त्यासाठी सर्व सदस्यांचे बँक खाते व आयएफएससी संकेतांक अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे यूएएनमध्ये रक्कम टाकणे व सदस्याला रक्कम देणे सोयीचे होणार असल्याचे ईपीएफओने म्हटले आहे.

या संदर्भात ईपीएफओने १२० हून अधिक क्षेत्रीय अधिका-यांना सर्व सदस्यांचे बँक खाते व आयएफएससी संकेतांक मिळवण्यास सांगितले आहे. यूएएनसाठी सर्व सदस्यांचे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक असल्याचे निर्देश सरकारकडून आले आहेत. तसेच १९५२ च्या ईपीएफ योजनेची उत्तम अंमलबजावणी, रकमा मिळण्यातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असल्याचे या सरकारी आदेशात म्हटले आहे.

या संदर्भात ईपीएफओचे केंद्रीय आयुक्त के. के. जालान यांनी सांगितले, या सरकारी िनर्देशांमुळे यूएएनची अंमलबजावणी करणे व सदस्यांचे बँक खाते क्रमांक मिळवणे सुलभ जाणार आहे.
ईपीएफओने सध्या १.८० कोटी सदस्यांचे बँक खाते क्रमांक िमळवले आहेत, तर ८६.९ लाख कर्मचा-यांचे पॅन क्रमांक आणि २८.२ लाख कर्मचा-यांचे आधार क्रमांक ईपीएफओने िमळवले आहेत.

काय करावे लागणार
ज्यांचा पीएफ कपात होतो अशा सर्व सदस्यांना आपल्या िनयोक्त्यामार्फत स्वत:चा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड यूएएनसाठी ईपीएफओकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत द्यायचा आहे.
जे कर्मचारी सध्या कोणत्याही िनयोक्त्याकडे कार्यरत नाहीत अशांनी आपला बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आपल्या फोलिओ क्रमांकासह छापील नाव असलेल्या क्रॉस धनादेशासह प्रादेशिक वा उपप्रादेशिक पीएफ कार्यालयाकडे पाठवावा.