आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Provident Fund News In Marathi, Divya Marathi, Investment

पीपीएफमध्ये वर्षाकाठी दीड लाख गुंतवण्याचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफमध्ये आता वर्षाकाठी १.५ लाख रुपये गुंतवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या संदर्भातील अधिसूचना दोन िदवसांपूर्वीच जारी केली होती, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनेही त्यावर निर्देश िदले. यामुळे प्राप्तिकर कायद्याच्या ८० क (सी) अंतर्गत आता पीपीएफमध्ये वर्षाकाठी दीड लाख रुपये गुंतवता येतील. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पीपीएफची मर्यादा ५० हजारांनी वाढवून दीड लाख करण्याची घोषणा केली होती. पीपीएफ हे गुंतवणुकीचे एक लोकप्रिय साधन आहे. यातील गुंतवणुकीवर १५ वर्षांचा लाॅक इन कालावधी असतो. मात्र प्राप्तिकरात िमळणाऱ्या सवलतीमुळे हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय उत्तम मानला जातो. ही गुंतवणूक ईईई श्रेणीत येते. याचाच अर्थ गुंतवणुकीच्या वेळी, व्याजावर आणि पैसे काढताना करात सवलत. वर्ष २०१४- १५ मध्ये पीपीएफमधील जमा रकमेवर ८.७ टक्के व्याज िमळणार आहे.

घरगुती बचतीला प्रोत्साहन िमळण्यासाठी जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात िकसान िवकास पत्र पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. या शिवाय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) जारी करण्याचे जाहीर केले होते.