आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Provident Idea And Get Money Bye Union Government

युवकांनो, उद्योगाची कल्पना द्या; सरकारकडून लाखो रुपये मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जर तुमच्याकडे उद्योग सुरू करण्यासाठीची एखादी कोणतीही सृजनशील कल्पना असेल तर तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. युवकांना उद्योगधंद्याकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक नवीन योजना तयार आखली आहे. या योजनेनुसार, युवकाची सृजनशील कल्पना वास्तवात आणण्यासाठी सरकार ते १३ लाख रुपयांपर्यंतची मदत करेल. यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने २०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. या निधीतून दरवर्षी २० हजार नवे स्टार्टअप तयार केले जातील. सोबतच दरवर्षी सुमारे लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रस्तावित योजनेनुसार, ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राच्या विकासावर खास जोर देण्याच्या तयारीत आहे.

सूक्ष्म, लघु मध्यम मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सृजनशील कल्पनेतून व्यवसायाची कशी उभारणी करायची यासाठी मंत्रालयातर्फे देशभरात १२० रॅपिड इनक्युबेशन सेंटर बनवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रातून तीन वर्षांत २.८८ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल. सोबतच स्टार्टअप सुरू करण्यासाठी दरवर्षी २० हजार व्यावसायिकांना पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत भांडवल दिले जाईल.
रॅपिड इनक्युबेशन केंद्र बनवण्यासाठी, सृजनशील कल्पना समोर आणण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक देखरेख समिती बनवण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. यात कृषी, अन्न प्रक्रिया, ग्रामीण विकास, आयटी विभाग, श्रम रोजगार मंत्रालय, डीआयपीपीचे सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
केंद्र आणि राज्य सरकारसोबतच खासगी संस्था आणि व्यक्ती रॅपिड इनक्युबेशन सेंटरची स्थापना करू शकतील. या केंद्रात प्लँट आणि मशिनरी लावण्यासाठी केंद्र सरकार कमाल ५० लाखांपर्यंतची ५० टक्के रक्कम देईल. यातून युवकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. जर एखाद्या युवकाने दिलेली कल्पना व्यवसायाच्या दृष्टीने समितीला पटली तर त्यासाठी त्याला लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्यात येईल. या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठीही केंद्र निधी देईल. एखाद्या व्यक्तीने स्टार्ट अपसाठी कल्पना दिल्यास त्याला चालना देण्यासाठी १३ लाखांपर्यंतचा निधी देईल. या माध्यमातून ५०० नव्या कल्पना आणि ३०० स्टार्ट अप कल्पनांना प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.