आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Auto Rickshaw Provide Uninor Mobile Recharge Facility

पुण्‍यातील रिक्षाचालक देणार युनिनॉर मोबाईल रिचार्जची सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे शहरातील रिक्षासेवेचा वापर करून प्रिपेड ग्राहकांना सीमकार्ड चार्ज सुविधा युनिनॉर कंपनीतर्फे देशात आज प्रथम येथे सुरु करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात औरंगाबाद, सोलापूर कोल्हापूर, नागपूर, नाशिक या शहरात आणि गोव्यात अंमलात आणली जाणार आहे. याबाबत माहिती देताना कंपनीचे महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे प्रमूख रितेश सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले की, केवळ ५८ रुपयात २८ दिवस सेवा देताना रिचार्जसाठी आम्ही रिक्षाचालकांच्या शहराच्या विविध भागात असललेल्या थांब्यांचा वापर करत आहोत. यामुळे रिक्षाचालकाला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी मिळेल. जवळच्या युनिनॉर केंद्रात ग्राहकाची माहिती द्यावी लागणार असल्याने अंमल सोपा होणार आहे. रिक्षाचालकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून औरंगाबादेत एका ओम्नी चालकाने २० दिवसात ४० हजार रुपयांचा व्यवसाय मिळवून दिला. प्रत्येक चालक महिन्याला ८०० -१००० रुपये यामुळे मिळवू शकतो.

अनावश्यक सेवा देऊन ग्राहकाला भूर्दंड पाडण्यापेक्षा स्वस्त आणि जरुरी इतकी सेवा हे आमचे ब्रीद वाक्य आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, महिन्याला एक लाख ग्राहक वाढविण्याचा आमचा हेतू आहे. इतर सेवा पुरवठादार कंपन्याच्या सरासरी २०० रुपयाच्या तुलनेत आमचे प्रती ग्राहक उत्पन्न १०८ रुपये आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्याने ते शक्य आहे.