आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Purchase Mobile Without Credit Card On Installment Base

क्रेडिट कार्डशिवाय मासिक हप्त्यावर करता येणार मोबाइल खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्या वर्षात मोबाइलप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. मुख्य मोबाइल विक्रेते मोबाइल स्टोअरने ग्राहकांसाठी मासिक हप्त्यांवर (ईएमआय) हँडसेट खरेदीची योजना आणली आहे. या योजनेनुसार देशातील पाच शहरांत ग्राहकांना क्रेडिट कार्ड नसतानाही ईएमआयवर मोबाइल हँडसेट खरेदी करता येईल.
मोबाइल स्टोअरच्या मते, पर्सनल फायनान्सचा हा पर्याय मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली आणि चेन्नई येथे उपलब्ध आहे. याअंतर्गत ग्राहकांना केवळ केवायसी (आपला ग्राहक जाणा) दाखल करून स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. जपानच्या एयॉन क्रेडिट सर्व्हिस या कंपनीच्या सहकार्याने मोबाइल स्टोअरने ही योजना सादर केली आहे. या योजनेमुळे ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड नाही त्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असल्याचे मत मोबाइल स्टोअरने व्यक्त केले. मोबाइल स्टोअरचे सीईओ हिमांशू चक्रवर्ती यांनी सांगितले, ईएमआय योजनेद्वारे नेहमीच हाय एंड आणि महागडे स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा देशात आजवर देण्यात आली आहे.