आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध सोने स्वप्नवत राहिले नाही; सोने हॉलमार्किंग झाले स्वस्त, परवाना शुल्कात 87 % कपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शुद्ध सोन्याच्या विक्रीस चालना मिळावी यासाठी सरकारने हॉलमार्किंगचे शुल्क 87.5 टक्क्यांनी घटवले आहे. प्रत्येक ज्वेलर्सला शुद्धतेचे प्रमाणपत्र देण्यासाठी क्रमांक (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) देण्यात येणार आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणार्‍या शहरात सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी आता 2,500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यापूर्वी देशातील कोणत्याही सराफाला तीन वर्षांच्या हॉलमार्किंग परवाना शुल्कापोटी 20,000 रुपये भरावे लागत होते. तीन ते 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरातील सराफांना आता तीन वर्षांसाठीच्या हॉलमार्किंग परवान्यापोटी 5000 रुपये शुल्क लागणार आहे. सोन्याची शुद्धता दर्शवण्यासाठी हॉलमार्किंग आवश्यक असते.