नवी दिल्ली- बजाज ऑटो कंपनीची 'क्वाड्रिसायकल RE60' येत्या एक ऑक्टोबरला भारतातील रस्त्यावर धावेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत फेब्रुवारी 2014 मध्ये घोषणा करण्यात आली होती.
दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाचे वकील अरविंद शर्मा आत्रर किर्ती मिश्रा यांनी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. क्वाड्रिसायकलसाठी भारतातील रस्ते सुरक्षित नसल्याचे शर्मा आणि मिश्रा यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे बजाजच्या
'क्वाड्रिसायकल'च्या लॉन्चिंगला परवानगी देऊ नये,अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणी कोर्टाने
आपला निर्णय दिलेले नाही.
35-40 किलोमीटर देईल मायलेज...
बजाजची 'क्वाड्रिसायकल RE60' ही गाडी प्रति लीटर 35-40 किलोमीटर मायलेज देईल. परंतु अद्याप क्वाड्रिसायकलला कारच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले नाही. टाटा नॅनोसारख्या स्वस्त कारला क्वाड्रिसायकल टक्कर देऊ शकते.
एक ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार....
'क्वाड्रिसायकिल RE60' वर अन्य ऑटो कंपन्यांनी आक्षेप नोंदवला होता. परंतु तरीही एक ऑक्टोबरला RE60 ला देशातील रस्त्यावर उतरवण्यास मंजुरी मिळाली आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये परिवहन मंत्रालयाने बजाज ऑटोच्या क्वाड्रिसायकलला मंजुरी दिली होती. क्वाड्रिसाइकिल ही देशातील ऑटो रिक्शाची जागा घेण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'क्वाड्रिसायकिल RE60' ची किंमत आणि फीचर्स...