आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम पदाच्या उमेदवारापेक्षा पंतप्रधान मोदी वेगळे असतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी 26 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा सार्‍या जगाची नजर त्यांच्यावर होती. गुजरात मॉडेल लोकप्रिय करणारे एक कट्टर हिंदुत्ववादी, बिझनेस-फ्रेंडली राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने त्यांच्याकडे सर्व शेजारी विशेषत: पाकिस्तान पाहतो आहे.
मात्र, मोदी यांच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांना आतापर्यंत आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सर्व जणांनी पाहिले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर आगामी काळात मोदी यांचे वेगळे रूप दिसू शकते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदी यांनी काही नाजूक विषयांना हात घातला. जसे : आई-मुलाचे सरकार सांगत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले, बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याची धमकी दिली, सीमेवरील सैनिकांचे शिर कापण्याच्या घटनेनंतरही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बिर्याणी पेश करणार्‍या मनमोहन सरकारवर ताशेरे ओढले, एवढेच नव्हे तर गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने गरिबांसाठी काहीच केले नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
मात्र निकालानंतर जसे मोदींचा विजय स्पष्ट झाला आणि भाजप स्वबळावर बहुमतासह सत्तेत आल्यानंतर कुशल राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांच्या भाष्यात बदल झाला. मागील आठवड्यात भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली तीत, मागील सरकारने जी चांगली कामे केली ती सुरूच राहतील असे मोदी यांनी सांगितले.