आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रघुराम राजन यांनी स्वीकारली आरबीआयचे गव्हर्नर पदाची सूत्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ.रघुराम गोविंद राजन यांनी आज (बुधवार) मुंबईत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर पदाची सूत्रे स्वीकारली. आरबीआयचे मावळते गव्हर्नर डॉ. दुव्वुरी सुब्बाराव यांनी त्यांना पदाची सूत्रे सोपवली. राजन हे आरबीआयचे 23 वे गर्व्हनर बनले आहेत. पुढील तीन वर्षे त्यांचा कार्यकाळ राहील.

राजन यांची गेल्या ऑगस्टमध्ये देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणारी घसरण, कमी झालेला आर्थिक विकास तसेच वाढती महागाई आणि यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली अस्थिरता, असे अनेक आव्हाने राजन यांच्यासमोर आहेत.

हे वाचा... MONEY... यामुळे घोंघावतेय भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे वादळ!