आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuram Rajan News In Marathi, Reserve Bank Of India, Divya Marathi

डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याची गरज - रघुराम राजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यामुळे डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी यांनी प्रतिपादित केली.
िडझेल विक्रीवर सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सबसिडीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी गेल्या वर्षी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दर महनि्याला डिझेलच्या दरात ५० पैसे वाढ करण्याची परवानगी दिली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने डिझेल विक्रीतून होणारे आिर्थक नुकसान आता फक्त प्रति लिटर ८ पैसे एवढेच राहिले आहे. या पार्श्वभूमीवर डिझेल नियंत्रणमुक्त केले तर तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारानुसार डिझेलचे दर कमी-अिधक करण्याचा अिधकार प्राप्त होईल. सरकारने पेट्रोल यापूर्वीच नियंत्रणमुक्त केले आहेत.

जन-धन लाभदायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल जन-धन योजना अत्यंत चांगली असल्याचे राजन यांनी नमूद केले. मात्र, यात केवळ खातेदारांची संख्या वाढवून चालणार नाही, तर प्रत्येकापर्यंत संबंिधत योजनांचे लाभ पोहोचले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

अर्थचक्र सुधारले
भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे राजन यांनी नमूद केले. चलनवाढही नियंत्रणात येत असल्याचे सांगून या काळात गुंतवणुकीला चालना देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.