आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्‍या एका क्लिकसरशी युरोप कवेत, रेल युरोपचे नवीन मोबाईल अ‍ॅप्‍स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रेल युरोपने भारतीय पर्यटकांसाठी मोबाईल अ‍ॅप्स बाजारात आणले असून त्यामुळे युरोपीय देशातील रेल्वे जाळे आणि वेळापत्रक तुमच्या टचस्क्रीनवर दिसणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला एजंट मार्फत केलेले आगाऊ आरक्षण सेलफोनवर बघता येणार आहे, अशी माहिती रेल युरोप इंडियाचे कार्यकारी संचालक कुणाल कोठारी यांनी पत्रकारांना दिली. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून युरोपात सर्वाधिक पर्यटक येतात असे त्यांनी स्पष्ट केले. रेल युरोप ही फ्रान्‍स आणि स्वित्झर्लंड यांच्या संयुक्त मालकीची प्रवास सुविधा देणारी कंपनी आहे.

गेल्या वर्षी भारतातून 15 हजार पर्यटकांनी आमच्या सेवेचा वापर केला. त्यातून आम्ही दोन कोटी युरो रकमेची तिकिटे विकल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ते म्हणाले, की यंदा ऑगस्ट अखेर संख्या नऊ हजार झाली आहे. गेली पाच वर्षे सातत्याने 18 टक्के दराने पर्यटक संख्या वाढते आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील सर्वाधिक पर्यटक युरोपात फिरण्यास येतात. मुंबई, पुणे आणि नागपूर या सर्वाधिक संख्या आहे. त्यातही स्वित्झर्लंडचे रेल्वे पास घेण्याचे प्रमाण 50 टक्के आहे.