आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railways May Replace Second Class Coaches With AC Ones

एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांमधील SLEEPER कोचची जागा घेणार AC कोच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारतीय रेल्वे व्यवस्थापनाने सर्व एक्स्प्रेस आणि सुपरफास्‍ट गाड्यांना एसी कोच बसवण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहे. या योजनेचा श्रीगणेशा दक्षिण रेल्वे विभागातून झाला आहे. एर्नाकुलम ते निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसचा (12617) 'स्‍लीपर कोच एस-2' ला एसी 3-टायरमध्ये परिवर्तीत करण्‍यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच मंगळवारपासून चेन्‍नई एगमोर टू मंगळुरु सेंट्रल एकस्प्रेसचे काही (अप व डाऊन) स्‍लीपर कोचच्या जागी एसी थ्री टायर कोच लावण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने सर्व एक्स्प्रेस गाड्यांना AC कोच असतील, असेही सूत्रांनी सांगितले.

प्रवाशांनला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रयत्न सुरु केले आहे. तसेच व्यवस्थापनाने सेकंड क्‍लास आणि स्‍लीपर कोचचे उत्पादन कमी करून AC कोचच्या उत्‍पादनावर अधिक भर दिल्याचे एका वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले. एक्स्प्रेस गाड्यांना AC कोच बसवण्याच्या योजनेला दक्षिण रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जुन्या स्‍लीपर कंपार्टमेंट्सला थ्री टायर एसी कोचमध्ये रुपांतरीत करण्याचे काम सुरु केले आहे.

मंगला एक्स्प्रेसला आधी 11 स्‍लीपर कोच होते. आता ही संख्या 10 झाली आहे. तसेच एसी 3-टायर कोचची संख्या आता चार झाली आहे. तसेच चेन्‍नई एगमोर टू मंगळुरु सेंट्रल एकस्प्रेसचे काही (अप व डाऊन) स्‍लीपर कोचच्या जागी एसी थ्री टायर कोच मंगळवारपासून बदलण्यात येणार आहे. स्लीपर कोचमधील मिडल बर्थ काढून पॅसेंजर गाड्यांना जोडले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

वाढीव तिकिटाचा भार प्रवाशांच्या खिशावर...
मंगला एक्स्प्रेसचे एर्नाकुलम ते निजामुद्दीनचे स्‍लीपर क्‍लासचे तिकिट 925 रुपये आहे. तर, थ्री टायर एसी क्लासचे तिकिट 2370 रुपये आहे. यामुळे या योजनेचा थेट फटका प्रवाशांना बसणार असल्याचे उघड आहे. दुसरीकडे, प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा फायदाही घेता येणार आहे.

पुढील स्‍लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेविषयी भारतीय रेल्वे समोरील आव्हाने...