आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन परिणाम: बाजारात किरकोळ घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर 150 अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स राजन यांच्या दरवाढीला लगाम देण्याच्या भाष्यामुळे सावरला. दिवसअखेर सेन्सेक्स 23.94 अंकांनी घसरून 20,683.51 वर बंद झाला. निफ्टी 9.60 अंकांनी घटून 6126.25 वर स्थिरावला. सकाळच्या सत्रात तेजीत असलेला सेन्सेक्स रेपो वाढीच्या वृत्तानंतर कोसळला होता. नंतर विक्रीचा जोर कमी झाल्याने त्यात सुधारणा झाली. धातू, रिअँल्टी, एफएमसीजी समभागातील खरेदीने सेन्सेक्सला सावरले. सेन्सेक्सच्या यादीतील 20 पैकी 16 समभाग वधारले, 13 घसरले, तर गेलचा समभाग स्थिर राहिला. टाटा मोटर्स आणि टाटा स्टील समभागांना चांगली मागणी दिसून आली, तर मारुती सुझुकी आणि अँक्सिस बँकेच्या समभागांना जोरदार विक्रीचा फटका बसला. मारुतीच्या तिमाही विक्रीत घसरण झाल्याने उच्चांकावर असलेल्या या समभागात मोठी घसरण दिसून आली.
युरोपातील प्रमुख बाजारात प्रारंभीच्या काळात तेजी दिसून आली. फेडरल रिझर्व्हची बैठक सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा गुंतवणूकदारांनी बडे सौदे टाळल्याचे दिसून आले. आशियातील प्रमुख बाजारांत संमिर्श कल होता.
टॉप लुझर्स : मारुती-सुझुकी, अँक्सिस बँक, सन फार्मा, इन्फोसिस, सिप्ला, हिंदुस्तान युनिलिव्हर
टॉप गेनर्स : टाटा स्टील, सेसा स्टरलाइट, टाटा मोटर्स, हिंदाल्को, बजाज ऑटो, भेल
रुपयाला तरतरी
सोमवारी डॉलरच्या तुलनेत त्रेसष्टी पार केलेल्या रुपयाला मंगळवारी तरतरी आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 59 पैशांची कमाई करत 62.51 पर्यंत मजल मारली. दोन महिन्यांतील एका सत्रातील रुपयाची सर्वात मोठी कमाई आहे.