आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजन इफेक्ट ओसरला, डॉलरच्या तुलनेत रुपयात पुन्हा घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयातदारांकडून डॉलरला मागणी आल्याने सहा दिवसांच्या तेजीनंतर रुपया आपटला. सेन्सेक्सने 216 अंकांची आपटी खात 19781.88 ही पातळी गाठली. निफ्टी 62.45 अंक गमावत 5,850.70 वर स्थिरावला. घसरणीच्या मार्गाने जाणारे सोने आणखी स्वस्त झाले. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 440 रुपयांनी घसरून 30,800 वर आले. चांदी किलोमागे 310 रुपये घटून 52,300 झाली. मागील दोन सत्रातील तेजीला गुरुवारी मात्र ब्रेक लागल्याचे चित्र बाजारात दिसून आले.


रुपया 63.50 वर
मागील सहा सत्रात डॉलरची यथेच्छ धुलाई करणारा रुपया गुरुवारी मात्र घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 12 पैसे गमावत 63.50 पातळी गाठली. आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाचे मूल्य घटले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची नियुक्ती झाल्यापासून प्रथमच रुपया घसरला. मागील पाच सत्रांत रुपयाने 425 पैशांची कमाई केली. तर चार सप्टेंबरपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 6.28 टक्के वाढ झाली

नफेखोरीचा फटका
उच्च पातळीवर पोहोचलेल्या बाजारात गुरुवारी काही प्रमाणात नफेखोरी दिसून आली. बाजाराचे लक्ष आता 17 व 18 तारखेला होणा-या अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लागले आहे.
अमर अंबानी, रिसर्च हेड, इंडिया इन्फोलाइन.