आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखीनिमित्त विशेष प्लॅन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावा-बहिणीच्या अतूट प्रेमबंधनाचा सण रक्षाबंधन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने बदलत्या काळाच्या ओघात भावाकडून बहिणीला ओवाळणी म्हणून दिल्या जाणा-या भेटवस्तूंचा टेंÑड बदलत चालला आहे. आता रोख रक्कम किंवा चॉकलेट्सऐवजी अर्थविषयक प्लॅन्स किंवा गॅजेट भेट म्हणून दिले जात आहेत.
गिफ्टचे असे नवे प्रकार बघून आम्ही तुम्हाला अशा काही योजना सादर करत आहोत. ही भेट बहिणीच्या जीवनात अनेक वर्षे आनंदाची भर टाकत राहील.
हेल्थ इन्शुरन्स - राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. हे वचन निभावण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी भेट म्हणून दिल्यास तिला आयुष्यभर विम्याचे संरक्षण मिळेल. तिला त्या रकमेतून चांगले उपचार व उत्तम आरोग्याची हमी मिळते.
ब्ल्यू चिप लाँग टर्म - ब्ल्यू चिप असणा-या कंपनीचे शेअर भेट देणेसुद्धा फायदेशीर ठरते. हे शेअर खरेदी केल्यानंतर फायद्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर इक्विटी एसआयपीमध्येसुद्धा बहिणीच्या नावाने गुंतवणूक करू शकता.
एसआयपी इन डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड - जर तुम्ही बहिणीला शेअर्स भेट देऊ इच्छित नसाल तर एसआयपी इन डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडसुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो. ही गुंतवणूक मोठमोठ्या कंपन्यांच्या फंडात किंवा डीएसपी टॉप 100 मध्ये करू शकता. याच्या मदतीने बहिणीला एकरकमी पैसा मिळू शकतो.
बँकेत मुदत ठेव - भेटीच्या स्वरूपात एखाद्या बँकेत मुदत ठेव ठेवून सर्टिफिकेट बहिणीला देता येते. सध्या विविध बँकांत ठेवींवर आक र्षक व्याज देण्याची स्पर्धा लागली आहे.
गिफ्ट कार्ड - विशेषकरून सणाच्या निमित्ताने अनेक बँकांनी गिफ्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. या कार्डांचा वापर शॉपिंग, पार्टी, डिनर किंवा अन्य प्रसंगी तुमच्या बहिणीला करता येतो. या गिफ्ट कार्डला एटीएमसारखा पिनकोड असतो.
सोन्याचे नाणे - सोन्याचे नाणे भेट देणे ही पारंपरिक प्रथा आहे. सध्या असलेली सोन्याची वाढती मागणी आणि चढे भाव पाहता ही बहिणीला चांगल्या स्वरूपाची भेट ठरू शकते.