नवी दिल्ली - कांदा आणि बटाट्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच हंगाम नसताना पुरवठा सुरळीत राहावा यासाठी या दोन्हींसाठी गोदामांची व्यवस्था हवी, असे मत केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी व्यक्त केले.
राज्यांकडून चालवण्यात येणार्या अन्न महामंडळाकडून कांदा, बटाट्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे शक्य असल्याकडे पासवान यांनी लक्ष वेधले. कांदा आणि बटाट्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होतात, हे टाळण्यासाठी सरकारी पातळीवर त्याचे नियोजन होणे आवश्यक असल्याकडे पासवान यांनी सांगितले.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)