आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Elected To National Academy Of Engineering

रतन टाटा यांची अमेरिकी राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीसाठी निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीसाठी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे रतन टाटा यांची निवड झाली आहे. ही अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यावसायिक संस्था मानली जाते. टाटा यांच्यासह भारतीय वंशाच्या आठ जणांची अकादमीसाठी निवड झाली आहे. आहे. अमेरिकेतील या आघाडीच्या संस्थेने आणखी 69 सदस्यांसाठी निवड करण्याचे जाहीर केले आहे. त्यात आणखी आठ भारतीयांचा समावेश असेल. अनंत अगरवाल, मूर्ती पी. भवराजू, गणेश कैलाशम, विजयकुमार, बलराज सहगल, प्रदीप सिंधू, कृष्णा सिंग यांचा निवड झालेल्या भारतीयांत समावेश आहे