आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Invest In Cardekho, Amount Not Disclose

रतन टाटांची कार देखो डॉट कॉममध्ये गुंतवणूक, रक्कम मात्र गुलदस्त्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी कार देखो डॉट कॉममध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा खासगी स्तरावर गेल्या काही दिवसांपासून विविध ई-कॉमर्स कंपन्यांत गुंतवणूक करत आहेत. मात्र, त्यांनी प्रथमच वाहन कंपनीच्या पोर्टलमध्ये रस दाखवला आहे.
या पोर्टलची प्रवर्तक कंपनी गिरनार सॉफ्टचे सीईओ अमित जैन यांनी सांगितले, शुक्रवारी रतन टाटा यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी त्यांनी वैयक्तिक गुंतवणुकीबाबत रुची दाखवली. गरज भासल्यास या कंपनीला सल्ला देण्याचीही तयारी टाटा यांनी दाखवली आहे. जैन यांनी या रकमेची माहिती मात्र दिली नाही.

त्यांनी सांगितले, टाटा भारतीय वाहन क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांचा अनुभव कंपनीला जास्त उपयुक्त राहील. टाटानी गुंतवणूक केलेली ही चौथी ई-कॉमर्स कंपनी आहे. मागील वर्षी टाटांनी स्नॅपडील, फर्निचर ई-खुदरा कंपनी अर्बन लॅडर, ऑनलाइन दागिने विक्री करणारी ब्ल्यूस्टोन या कंपन्यात गुंतवणूक केली आहे.

जैन म्हणाले, हाँगकाँग येथील हिलहाऊस आणि टाईबोर्न या गुंतवणूकदारांनी नुकतेच कंपनीच्या सिरीज बी राउंड अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. त्यानंतर गिरनार सॉफ्टवेअरचे मूल्य ३० कोटी डॉलर (१८०० कोटी रुपये) धरण्यात आले. आगामी पाच वर्षांत बिलियन डॉलर कंपनी बनण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. काही छोटे पोर्टलचे अधिग्रहण करण्याचीही योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.