आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Meet Maharashtra CM Prithviraj Chavan

रतन टाटा-मुख्यमंत्री यांची ‘सीएसआर’ भेट, 'राज्याला पूर्ण सहकार्य'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रतन टाटा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी त्यांनी टाटा उद्योग समूह महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले आहे.

राज्याला पूर्ण सहकार्य : टाटा
शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत शासनाने आखलेल्या विकासाच्या योजनेत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा (सीएसआर) भाग म्हणून सहभागी होण्याची तयारी रतन टाटा यांनी दर्शवली आहे.
सचिवांचा कोअर ग्रुप
राज्याच्या विकास योजनांत टाटा समूहाचा सहभाग असावा आणि त्या दृष्टीने नियोजन व निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ सचिवांचा कोअर ग्रुप स्थापन करण्याचा निर्णय या वेळी झाला.